बिबी का मकबरा. आकाशातून दिसणारी ही वास्तू ताजमहालच्या सौंदर्याशी स्पर्धा करते. पण याच मकबऱ्यावरुन आता रण माजलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याने या मकबऱ्यातल्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यास घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे.या मकबऱ्यातल्या काही भागाची मालकी ही वक्फ बोर्डाकडे आहे. पण वक्फ बोर्डानं मात्र अधिकार नसल्याचं सांगून हात वर केले आहेत. आता प्रकरण जेव्हा धर्माशी निगडीत असतं, तेव्हा त्यात राजकीय हस्तक्षेप तर होणारच. मकबऱ्यात नमाज अदा करु द्या, अन्यथा आंदोलनं करण्याचा इशारा एमआयएम च्या आमदारांनी दिला आहे.औरंगाबादच्या ऐतिहासिक वैभवात भर टाकणार हा बिबीचा मकबरा. बिबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेब चा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला. औरंगाबादमध्ये बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी हिची कबर आहे.इतिहासामध्ये निजामानं 'बीबी का मकबरा' थेट औरंगाबादहून हैदराबादला नेण्याची तयारी केली होती. त्यासाठी एका कंपनीला कामही देण्यात आलं होतं, पण निझामाला दृष्टांत झाला आणि त्याने बेत रद्द केला.आता पुरातत्व खात्यालाही या बंदीवरचा दृष्टांत होईल आणि नमाजाची परवानगी मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाला आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
